‘संजय पांडेंना ‘या’ बोलीवर मुंबई पोलीस आयुक्त केलं?’

0

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात पेन ड्राईव्ह सादर करत विधानसभा हलवून टाकली. फडणवीसांनी इतके गंभीर आरोप केले आहेत की प्रत्येकाच्या मनात आता संशयाची सुई निर्माण झाली आहे. यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेले संजय पांडेंबाबतही खळबळजनक खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काही व्हिडीओ फुटेज सभागृहात सादर केले. यामधील एका क्लिपमध्ये संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणत्या बोलीवर नियुक्ती करण्यात आली. फडणवीसांनी सादर केलेल्या क्लिपमध्ये, पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे निवृत्त होत आहेत. आता ते मुंबईचे सीपी झाले असून त्यांनी केस रजिस्टर करून घेणार देतो असं सांगितलं आहे. त्याच बोलीवर आपण त्यांना बसवलं आहे. मी रजिस्टर करायला सांगतो असं त्यांनी सांगितलं आहे. जयंत पाटील बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा मग त्यांनी कारवाई केली नाही की दोन दिवसांनी पत्रकार परिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा मग आम्ही हायकोर्टात जाऊ, तोपर्यंत मेडिकलची फाईल सापडेल. भाजपला 10 कोटी देणगी मिळाली याची तुम्ही तक्रार दाखल करा, या पत्रामुळे नवाब मलिक यांची चौकशी स्टॉप होईल, असं क्लिपमधील संभाषण आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या संभाषणाचे व्हिडीओ दाखवले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेते भाजपच्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीसांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहिती आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.