कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा पुन्हा बंद; पुणे शहरात अद्याप कोणताच निर्णय नाही

0

पुणे : कोरोनासोबत ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा निर्णय जाहीर केले. यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील शांळांबाबत विचारण्यात आले. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असंही महापौर म्हणाले.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. काल पुण्यात 524 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 36 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कोरोनास्थिती आणि आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 27 डिसेंबरपासून ते कालपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत पोहोचली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढतत असली तरी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं नाहीत. ओमिक्रॉनचे 36 रुग्ण आहेत. यात दोन डोस घेतलेले 70 ते 75 टक्के लोक आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 80 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती महापौरांनी दिली.

शाळेचा निर्णय पालकमंत्र्यांच्या बैठकीत

महापौर म्हणाले, लसीकरणामध्ये पुणे राज्यात सर्वात पुढे आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस सुरु करत आहोत. तसेच नवीन निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यात शाळा, उद्यानं  आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विचार केला जाईल, असं महापौरांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.