सासरवाडीत येऊन चोरी करणाऱ्या मुंबईच्या चोरट्यांना अटक

वाकड पोलिसांची कामगिरी, 15 लाखांचा ऐवज जप्त

0

पिंपरी : वाकड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात तिघांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल 22 गुन्हे उघडकीस आणले. तसेच 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार प्रशांत गिलविले, सुरज सुतार व तात्या शिंदे यांना माहिती मिळाली की, घरफोडीतील दोन सराईत गुन्हेगार ताथवडे येथे निलकमल हॉटेल समोरील रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने थांबले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दिलीप विश्वनाथ काळे (38) व रवि ऊर्फ रोहीत अनिल मारवे (21, दोघे रा. म्हारळगांव, ता. कल्याण, जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी आणखी एका साथीदारासोबत मिळून केलेल्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या तब्बल 13 गुन्ह्यांची कबुली दिली.

या चोरट्यांकडून 175 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, सहा हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी दुचाकी, असा एकूण 9 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर , नितीन गेंगजे व विक्रम जगदाळे यांना सराईत चोरटा अक्षय अनिल काशीद (24, रा. पवारनगर, थेरगाव) याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कस्पटेवस्ती येथील ॲम्बीयन्स हॉटेल समोर सापळा रचून अक्षय आला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 5 लाख 30 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तब्बल 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संतोष पाटील सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, उपनिरीक्षक सिध्दनाथ बाबर, कर्मचारी सुरज सुतार, प्रशांत गिलबीले, विभीषन कन्हेरकर, तात्या शिंदे, बापुसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, राजेंद्र मारणे, शाम बाबा, सचिन नरुटे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, प्रमोद कदम, कौतेय खराडे, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.