कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबई, वसई-विरारची निवडणूक लांबणीवर

0

मुंबई : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या ठिकाणी प्रशासकांना मुदतवाढ देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यास रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील बहुचर्चित नवी मुंबई, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ- बदलापूर नगरपालिका आणि मुरबाड, शहापूर नगर पंचायतींची निवडणूक पुढे गेली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जरी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरी गावे वगळण्याचा वाद सुरू असल्याने जोवर तो तिढा सुटत नाही,
तोवर तेथील निवडणुका  न घेण्याबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.

निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांत नियुक्त प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्यात येणार असून, त्यात महापालिका, नगरपालिकांचाही समावेश असेल. त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधेयक सादर करण्यात येणार असून, त्याच्या मसुद्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.