“महाराष्ट्र श्री २०२३” किताबाचा मानकरी ठरला मूंबई चा रसल डिब्रेटा

0

पिंपरी  : कासा दे सिल्व्हर ताथवडे येथे झालेल्या महाराष्ट्र श्री २०२३ या भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातून खेडाळूंना भाग घेतला. मूंबई च्या रसल डिब्रेटा ने महाराष्ट्र श्री २०२३ या किताबावर आपले नाव कोरले. कोल्हापूर चा अजिंक्य रेडेकर उपविजेता ठरला तर पश्चिम ठाण्याचा नितीन म्हात्रे याने तिसरा क्रमांक पटकाविला. वूमन मॉडेल फिजिक मध्ये मुंबई सबरबन ची रेनूका जेनौती, वूमन बॉडी बिल्डिंग मध्ये मुंबई ची हर्षदा पवार व मेन्स फिजिक गटात पिंपरी चिंचवड चा अजिंक्य जगताप व मूंबई च्या अलंकार पिंगे याने बाजी मारली. सदर स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष किरण सावंत यांनी स्वीकारली बॉडी
एकूण साडे सहा लाख रूपयांची रोख रक्कम आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.

बिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड संघटनेच्या वतीने हि स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन किसन सावंत व कांतीलाल सस्ते, वर्ल्ड बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशन चे सेक्रेटरी जनरल श्री चेतन पठारे तसेच वर्ल्ड बॉडिबिल्डींग, एशियन, साऊथ एशियन बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशन चे लिगल ॲडव्हाईजर श्री विक्रम रोठे व साऊथ एशियन बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशन चे अध्यक्ष श्री प्रशांत आपटे यांच्या हस्ते झाले. किरण सावंत यांनी अतिशय कमी वेळात उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन करत, खेडाळूंना भरघोस बक्षिसे ठेवून महाराष्ट्र श्री या मानाच्या स्पर्धेला न्याय देण्याचं काम केले असे चेतन पठारे यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

नवनिर्वाचित महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड झालेल्या किरण सावंत यांनी तूम्ही सर्व लोकांनी माझ्यावर सोपविलेली महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशन ची जबाबदारी, व ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा पूरेपूर प्रयत्न करेल. आणि येणार्या काळात या खेळाच्या प्रचार प्रसाराचे काम उत्तमोत्तम करत राहण्याचा प्रयत्न असेल असे उद्गार काढले. याप्रसंगी आय बी बी एफ च्या सेक्रेटरी जनरल हिरल शेठ शहा उपस्थित होत्या, महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशन चे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण व खजिनदार सूनिल शेगडे यांनी संपूर्ण स्पर्धेची सूत्रे सांभाळली. तसेच संतोष पवार यांनी सूत्रसंचालन केले, बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड चे सरचिटणीस महेश गणगे यांनी आलेल्या सर्व संघटनेचे पदाधिकारी पंच व खेळाडू यांचे आभार मानले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे..
५५ किलो :
१)ओमकार आंबेकर ( मूंबई)
२) नितीन शिगवण ( मूंबई सबरबन)
३) मंगेश पाटील ( ठाणे )

६० किलो :
१) रामा मायनाक ( सातारा)
२) बप्पन दास ( मुंबई)
३) दिपक गूप्ता ( ठाणे)

६५ किलो :
१) नितीन म्हात्रे ( पश्चिम ठाणे )
२) आकाश घोरपडे ( मूंबई )
३) मुंबई सबरबन )

७०किलो :
१)संदिप सावळे ( मुंबई सबरबन)
२) पंचक्रांती सोनार ( सोलापूर)
३) श्रीनिवास वास्के ( पिंपरी चिंचवड)

७५किलो
१) रोहन गूरव ( मूंबई सबरबन )
२) अभिजित पाडळे ( सातारा )
३) दिपक डांबळे ( नाशिक)

८० किलो
१)विश्वनाथ बकाली ( सांगली )
२) गणेश पेडामकर ( मुंबई)
३) आशिष लोखंडे ( मुंबई सबरबन)

८५किलो
१)अजिंक्य रेडेकर ( कोल्हापूर)
२) महेश राव ( ठाणे )
३) आनिकेत पाटील ( मुंबई)

८५ वरील
१) रसल डिब्रेटो ( मुंबई)
२) दिपक तांबटकर ( मुंबई)
३) समीर ताळे ( ठाणे )

वूमन बॉडी बिल्डिंग
१)हर्षदा पवार (मूंबई)
२) तन्वीर हक ( पिंपरी चिंचवड)
३) मनिषा हळदणकर ( ठाणे )

वूमन मॉडेल फिजिक
१)रेणूका जेनौती ( मुंबई सबरबन)
२) अदिती बंब ( पिंपरी चिंचवड)
३) शितल वाडेकर ( पिंपरी चिंचवड)

मेन्स फिजिक १७० सेमी
१)अजिंक्य जगताप ( पिंपरी चिंचवड)
२) अनिकेत सावंत ( मुंबई सबरबन)
३) आकाश जाधव ( मुंबई सबरबन)

मेन्स फिजिक १७० सेंमी वरील
१) अलंकार पिंगे ( मूंबई)
२) राहूल ब्रम्हेकर ( ठाणे )
३) रोहित सवाईराजे ( कोल्हापूर)

टीम चॉम्पीयनशीप : मुंबई
रनर अप : मुंबई सबरबन

Leave A Reply

Your email address will not be published.