325 मालमत्ताधारकांना महापालिकेने दिली नोटीसा

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेलाही नोटीस

0
पिंपरी : पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस दिली आहे. संथेने 1 कोटी 83 लाख मालमत्ता कर थकविला आहे तसेच 25 लाखांच्या पुढील थकबाकी असलेल्या 325 मालमत्ताधारकांनाही महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत.

सात दिवसांच्या आत थकबाकी भरावी . अन्यथा मालमत्ता सील करण्याचा इशारा दिला आहे . पिंपरी – चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत . त्यामध्ये निवासी चार लाख 47 हजार 8 , बिगरनिवासी 46 हजार 828 , औद्योगिक तीन हजार 700 , मोकळ्या जागा आठ हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर पाच हजार 202 मालमत्ता आहेत.या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते . परंतु, अनेक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. कर थकविला आहे . त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडत आहे.

महापालिकेने थकबाकीदारांनवर जोरात कारवाई सुरु केली आहे.अशी माहिती करसंकल विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.