पुणे : राज्य सरकारने निवडणुकीसाठी केलेला कायदा न्यायालयात टिकला नाही तर निवडणुका लगेचच होऊ शकतात. निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे गाफील राहू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
अप्पर डेपो येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी स्पष्टीकरण देतानाच सर्वच वावड्यांना ब्रेक लागला आहे. पवार म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. यासाठी राज्य सरकारने एकमताने कायदा तयार केला.
त्या अध्यादेशावर राज्यपालांनी देखील स्वाक्षरी केली आहे. परंतु हा कायदा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही तर राज्य निवडणूक आयोग केंव्हाही महापालिकांच्या निवडणूक जाहीर करू शकते. तसेच दोनचा प्रभाग होणार अशा वावड्या कोणी उठवल्या असे म्हणत
आगामी निवडणुक त्रिसदसिय पद्धतीनेच होईल, यामुळे कामाला लागा असे ही पवार यांनी स्पष्ट केले.