पिंपरी : पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी एकाचा कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 6) रात्री घडली. आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पंकज धोत्रे (रा. थेरगाव) असे खून झालेल्याचे नाव असून त्याच्यावर देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर वैभव गायकवाड, प्रथमेश शिंदे आणि मंथन चव्हाण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज धोत्रे आणि आरोपी याच्यात पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंकजच्या मागावर होते.
रविवारी रात्री थेरगाव येथील सोळा नंबर बसस्टॉप येथे पंकज दिसला. त्यावेळी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पंकजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली आहे.