पिंपरी : धारदार शस्त्राने डोक्यावर मारहाण करून कामगाराचा निर्घृण खून केला. बुधवारी (दि.१) सकाळी दहा वाजताच्या सुमारास बावधन येथे म्हसोबा मंदिराजवळ कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
प्रेमबहादूर करण थापा (वय ४०, रा. पाटीलनगर, बावधन) असे खून झालेल्या कामगारांचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी अंजली प्रेमबहादूर थापा (वय ३५, रा. पाटीलनगर, बावधन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन रामनदी येथे म्हसोबा मंदिराजवळ इ स्क्वेर इमारतीच्या मागे कंपाउंड लगत निर्जनस्थळी एक मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह प्रेमबहादूर थापा याचा असून त्याच्या डोक्यावर गंभीर मारहाण करून खून केल्याचे निष्पन्न झाले. सोमवार (दि.१९) ते मंगळवारी (दि.२१) या दरम्यान घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस निसरीक्षक (गुन्हे) सोन्याबापू देशमुख अधिक तपास करीत आहेत.