मोबाईल दुकानातील मुलाचा खून; आरोपी अटकेत

0
पिंपरी : मोबाईल चार्जिंग कॉड घेण्यासाठी मोबाईल दुकानातील मुलावर गोळी झाडुन खुन करणाऱ्या आरोपीला वाकड पोलीसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत. स्वांतत्र्यदिवशी झालेल्या या घटनेमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आरोपीला पकडण्यात वाकड पोलीसांना यश आले आहे.
किरण शिवाजी वासरे (25 वर्ष रा. जी के लेबर कॅम्प पार्क, रॉयल सोसायटी शेजारी, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर ओवेज इसाक इनामदार (16 वर्ष, रा. सांडभोर पोल्ट्री फार्म शेजारी, विजय नगर, काळेवाडी) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मयताचे वडील इसाक इस्माईल इनामदार ( रा. सांडभोर पोल्ट्री फार्म शेजारी, विजय नगर, काळेवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या रात्री साडे आठ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटणी येथे खुनाची घटना घडली. आरोपी हा मोबाईलच्या दुकानात मोबाईल चार्जिंग कॉड घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी मयत ओवेज हा दुकानात काम करीत होता. मयत ओवेज याच्या मामाचे हे मोबाईलचे दुकान आहे. आरोपी याने मोबाईल कॉड मागताना स्वतः सोबत असलेली बंदुक बाहेर काढली. यावेळी मयत ओवेज याने तु बंदुक कशाला आणली, तु येथुन जा.. नाहीतर मी तुझी पोलीसांत तक्रार करीन.. असे आरोपीला सांगितले. असे म्हटल्यामुळे आरोपी किरण वासरे याला राग आला. त्याने स्वतः कडील बंदुकितील गोळी मयत ओवेज याच्या दिशेने फायर केली. ती गोळी मयत ओवेज याच्या उजव्या छातीत घुसली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
गोळीबार करुन आरोपी किरण हा घटनास्थळावरुन पळुन गेला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह संबंधीत पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवुन तपास करण्यासंबंधात मार्गदर्शन व सुचना केल्या.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेत वाकड पोलीस तसेच गुंडा स्कॉड पथक आणि गुन्हे शाखा युनीट – 4 च्या पथकाला आरोपीचा तत्काळ शोध घेवुन ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्या अनुषंगाने वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी तीन तपास पथक तयार करुन आरोपीचा शोध करण्यासाठी रवाना केले.
आरोपीचा तपास तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे सुरु असताना तसेच पोलीस तपास करीत असताना वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बापुसाहेब धुमाळ यांना माहिती मिळाली की, आरोपी हा हॉटेल टिम लक लक शेजारी असलेल्या लेबर कॅम्प मधील त्याच्या दाजीच्या घरी लपुन बसला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्याला विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला.  आरोपी किरण वासरे याच्यावर यापूर्वी हाणामारी केल्याचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने आरोपीला सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अवधुत शिंगारे, पोलीस अंमलदार बापुसाहेब धुमाळ, बाबजान इनामदार, बिभीषन कन्हेरकर, प्रशांत गिलबिले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, तात्या शिंदे, नितीन गेंगजे, शाम बाबा, कौतेय खराडे, नितीन ढोरजे, जावेद पठाण, अतिश जाधव, कल्पेश पाटील, सी.बी. साळुंखे, नुतन कोंडे  , निलेश वानखेडे, तुषार गाडेकर यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.