ताथवडे येथील ओयो टाऊन हाऊसच्या रूम मध्ये पोलिसाच्या मुलीचा खून

0

पिंपरी : फेसबुकवरील ओळखीतून प्रेम प्रकरण, घरच्यांच्या परस्पर पळून जाऊन लग्न आणि त्यानंतर लग्न झालेल्या तरुणासोबत राहण्यास नकार यातून पोलिसाच्या मुलीचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला जबरदस्तीने ‘लॉज’वर नेवून, स्कार्पच्या सहायाने गळा आवळून खून केल्याची तक्रार तरुणीच्या वडिलांनी दिली आहे. ही घटना आज (शुक्रवारी) उघडकीस आली आहे.

सपना अशोक गवारे (27, रा. तुकारामनगर, वाशी, उस्मानाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हेमंत अशोक मोहिते (29, रा. तळबीड, ता. कराड, जि. सातारा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अशोक नारायण गवारे (54, रा. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सपना ही उच्चशिक्षित असून ती आयटी कंपनीत काम करत होती. गुरुवारी सकाळी अशोक याने सपना हिला धमकावले. सपना हिचा अशोक बरोबर लग्नाला विरोध होता. याचा राग अशोक याला होता. या रागातून अशोक याने सपना हिला धमकावले.

जबरदस्तीने ताथवडे येथील ओयो टाऊन हाऊस मधील रूम मध्ये नेले. त्या ठिकाणी अशोक याने सपना हिचा ‘स्कार्प’च्या सहाय्याने गळा आवळून खून केला असल्याची तक्रार दिली आहे.

सपना आणि अशोक यांची एक वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर दोघात प्रेम झाले. घरच्यांना कल्पना न देता एक महिन्यापूर्वी दोघांनी लग्न केले. काही दिवसांपूर्वी सपना माहेरी गेली. तेंव्हापासून ती अशोक बरोबर रहाण्यास तयार नव्हती. यातून दोघांमध्ये वाद होते. यातूनच अशोक याने तिला खून केल्याचे तपासात समोर आले आहे. वाकड पोलिसांनी आरोपी अशोक याला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.