पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण परिसरात तरुणाच्या भरदिवसा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरून 7 ते 8 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करून खून केला.
रोहित सहाणे (17, रा.चाकण) या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेला आहे. चाकण येथील कांदा मार्केट समोरील पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या मैदानात भरदिवसा आज सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकाला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले. तपास चाकण पोलीस करत आहेत.