देहूरोड पोलिसांनी अज्ञात लोकांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तळवडे-चाकण मार्गावरून तळवडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मच्छिंद्र भालेकर यांच्या नियोजित हॉटेलच्या बाजूला तरुणाचा मृतदेह आढळला.
तरुण ३० ते ३५ या वयादरम्यानचा आहे. त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असून घटनास्थळावरून रक्ताने माखलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे.
रंगाने निमगोरा, केस काळे, सामान्य शरीरयष्टी, अंगात विटकरी रंगाचे जर्किन, त्यावर हिरव्या रंगाचा पट्टा, पांढऱ्या रंगाची ‘लेव्हीस’ अशी इंग्रजीत छापलेली अक्षरे, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाचे बूट असे खून झालेल्या तरुणाचे वर्णन आहे. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजी व्ही अक्षर गोंदलेले आहे.
घटनास्थळी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट देऊन माहिती घेतली. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस पथकासह दाखल झाले होते.