पूर्वीच्या भांडणातून तरुणाचा खून, दोघांना अटक

0

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करुन खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १०) रात्री दहा वाजता औंध रुग्णालयाच्या समोर घडली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

शेखर मनोहर चंडाले (२७, रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गोविंद केडाशिवा वाघेला (५०, रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय अशोक नाईक (२३, रा. सर्व्हंट क्वार्टर, सांगवी फाटा, औंध), विक्रम उर्फ बिकू श्रीकेसरीन सिंग (१८, रा. बोपोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर आणि अटक आरोपी यांच्यात भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन गुरुवारी रात्री शेखर याच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करुन त्याचा खून केला.  सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी घटनेचा समांतर तपास सुरु केला. गुन्हे शाखा ययुनिट चारच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.