अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नीचा खून

0

पुणे : अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विनी सचिन काळेल (25) असे मृत महिलेचे नाव आहे. एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य अनैतिक संबध असल्याच्या रागातून हा खून केला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथे मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, सचिन काळेल असं त्या पतीचं (आरोपी) नाव आहे. सचिनची पत्नी अश्विनी काळेलचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते. या सर्व प्रकाराबाबत अश्विनीच्या कुटुंबीयांना आणि सासरच्या मंडळींना सर्व कल्पना होती. घरच्यांनी आणि सासरच्यांनी विरोध करूनही अश्विनी पतीला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत होती. आरोपी पती सचिनने पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत अश्विनीला तिच्या पतीसोबत किंवा तिच्या कुटुंबीयांकडे राहण्याचा सल्ला दिला होता. पण ती प्रियकरासोबतच राहत होती.

दरम्यान, पती आणि कुंटूबीयांनी सांगून देखील अश्विनी ऐकत नव्हती. दरम्यान, मंगळवारी रात्री अश्विनी आणि तिचा पती सचिन हे एकत्र झोपले आणि सकाळी 5 वाजताच्या सुमारास दोघांत वाद झाला. हाच वाद पुढे विकोपाला गेला. सचिनने आपल्या पत्नीचे उशीने तोंड दाबले. आणि चाकुने गळा कापून तिची हत्या केली. यानंतर आरोपी सचिनला पोलिसांकडून अटक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.