पिंपरी : प्रेम विवाह केलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून केला. हा धक्कादायक प्रकार मोशी येथे सोमवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आला.
सरला साळवे (32) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती विजयकुमार साळवे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपूर्वी सरला आणि विजयकुमार यांचा प्रेमविवाह झाला आहे. ते दोघेही विदर्भातील असून ते कामानिमित्त मोशी येथे राहत होते. प्रेमविवाहानंतर काही दिवसातच दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन वाद होउ लागले.
रविवारी रात्री सरला त्यांच्या घरी झोपल्या असता विजयकुमार याने हातोडा डोक्यात घालून खून केला. त्यानंतर चाकूने अंगावर वार केले. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.