अनैतिक संबंधाच्या संशयातून खून; पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

0
चाकण : पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाचा खून करून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चाकण एमआयडीसीमधील नाणेकरवाडी येथील एका कंपनीत मंगळवारी (दि.१० ) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  घडली आहे.
अमोल गजानन राणे (३८ वर्षे,रा.आळंदी देवाची ) असे खून झालेल्या असिस्टंट मॅनेजरचे नाव आहे.याप्रकरणी गणेश मदनलाल गोलेचा (३३ ,रा.चाकण ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार चाकण पोलिसांनी रामेश्वर वामन पवार (३५ ,रा. नाणेकरवाडी ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चाकण एमआयडीसीमधील नाणेकरवाडी हद्दीतील भवानी इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीमध्ये ही खुनाची घटना घडली आहे. या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीस असणाऱ्या अमोल राणे याचे रामेश्वर पवार यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात कंपनीमध्ये मोठा वाद झाला.
या वादातून रागाच्या भरात कामगार पवार याने राणे याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला. तसेच आपल्या पत्नीलाही लोखंडी स्टूलने जबर मारहाण करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी कंपनीतून फरार झाला होता. परंतु, चाकण पोलिसांनी वेगाने आपली तपास चक्रे फिरवून चार तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.