व्याजाच्या पैशांवरून सावकाराचा खून

0

पुणे : व्याजाच्या पैशाचा तगादा लावणाऱ्या सावकाराचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे.

युवराज बाबुराव जाधव (३४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश सुरेश खरात (३५, रा. फुरसुंगी) याला अटक केली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज जाधव हा फुरसुंगीमधील पापडे वस्तीत राहण्यास असून, त्याचा मोठा मशीचा आहे. तसेच, तो व्याजाने देखील पैसे दत असत. तर, गणेश खरात हा कारवर चालक म्हणून काम करत होता. त्याने काही महिन्यांपुर्वी युवराज याच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, त्यांच्यात पैशांवरून वाद होत असत. युवराज हा सतत पैशांबाबत तगादा लावत होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी देखील युवराज याने गणेशला पैशांवरून अश्लील भाषेत बोलत त्याचा अपमान केला. कुटूंबाबत अपमान्सपद बोलल्याने गणेशला भयंकर राग आला. या रागाच्या भरात त्याने खून केल्याचे पोलीसांनी सांगितले.

युवराज हा सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घराच्या समोर दुचाकीवर बसलेला होता. त्याचवेळी गणेश हा कुऱ्हाड घेऊन त्याच्या पाठिमागून आला. त्याने थेट युवराजच्या डोक्यात आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वारकरून त्याचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या गणेश याला अटक केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.