टीका करणाऱ्यांमुळेच माझी प्रगती : दीपिका पादुकोण

0

मुंबई ः बाॅलिवुडची आघाडीची आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणने हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता, असे दीपिकाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. दीपिका म्हणाली की, ज्यावेळी माझा पहिला ‘ओम शांती ओम’ सिनेमा रिलीज होणार होता तेव्हा खूप जणांनी माझी चेष्टा आणि माझ्यावर टीका केली होती.

दीपिका म्हणाली की, “हिंदी चित्रपटसृष्टीत असाही एक समूह होता ज्याने माझ्या कामांवर खूप टीका केली. ते म्हणत होते की, ही एक माॅडेल आहे ती अभिनय करू शकणार नाही. माझ्या अक्सेंटची चेष्टा केली जात होती. काही जणांनी तर माझ्याबद्दल खूप काही नकारात्मक लिहिली होती आणि विशेष म्हणजे त्या गोष्टी मला खूपल त्रासदायत होत्या. जेव्हा तुम्ही केवळ २१ वर्षांचे असता आणि तुमच्यावर टीका केली जाते तेव्हा खूप जास्त प्रभाव पडत जातो.”

दीपिका पुढे सांगते की, “मात्र, ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्यांच्यामुले मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. या टीकेने एक प्रकारचे इंधनाचे काम केले. त्यांनी मला खूप कष्ट करण्याची हिंमत दिली. माझ्या कौशल्यांना वाढविण्यास मदत केली. माझ्या विकासात टीका करणाऱ्यांची खूप मदत मिळाली. कितीतरी वेळी मला खाली पाडण्यात आले. परंतु, या अनुभवांनी मी कधी खचून गेले नाही. उलट ज्यांनी माझ्यावर टीका केली. त्या सर्वांची मी आभारी आहे”, असे अनुभव दीपिकाने शेअर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.