बनावट मिळकत दाखवून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक

0

पिंपरी : नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या शाखेत चिंचवड शाखेची २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकेच्या कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान घडला. याप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (५६, रा. औरंगाबाद रोड, सावेडी, अहमदनगर) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मुंजदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले, (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. नेश लीब टेक्‍नोरिअर आणि मे. इंडियन इंजिनिअरिंग इंडस्ट्री पुणे या कंपनीच्या कर्जदार आरोपी यांनी आपसांत संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज प्रकरणामध्ये तारण गहाण मिळकतीचे बनावट मूल्यांकन अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारे कर्ज उपसमिती आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केली. तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजीत खुळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.