‘मोरया गोसावीं’चे आशिर्वाद घेऊन नाना काटेंनी केला प्रचाराचा शुभारंभ

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या 15 दिवसांवर आली असल्याने महाविकास आघाडी अतिशय जोरात प्रचारात उतरली आहे. आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराचा आज (रविवारी) शुभारंभ केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हजेरी लावली होती.

श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिराच्या परिसरात  महान साधू मोरया गोसावी यांच्या चरणी नारळ अर्पण करून श्रींची महाआरती करत आज महाआघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. यानंतर चाफेकर चौकातील चाफेकर बंधूंच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी निरीक्षक आमदार सुनील आण्णा शेळके, आमदार अण्णा बनसोडे, आमदार विलास लांडे, माजी महापौर संजय वाघेरे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, चिंचवड विधानसभेचे प्मारचार प्जीरमुख भाऊसाहेब भोईर,  महापौर मंगलाताई कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष, कैलास कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविताताई अल्हाट, नरेंद्र बनसोडे, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, अपर्णाताई डोके, राजेंद्र गावडे,  सुनील गव्हाणे व पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने या प्रचार शुभारंभासाठी उपस्थित होते.

नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रहाटणी व पिंपळे सौदागर गावातील नागरिकांनी एकत्र येत पाठिंबा दर्शवला आहे. नाना काटेंना  आमदार करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. रहाटणी या गावात देखील नाना काटे यांचे भरीव काम आहे. रहाटणी येथील नागरिक थेट नाना काटे यांना काहीही अडचण असली तर हक्काने सांगतात. आणि नाना काटे देखील त्यांची मदत करतात. याच कारणाने सर्व गावकऱ्यांनी एकत्र नाना काटे हेच पुढील आमदार असतील हे ठरवून टाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.