आफ्रिकन महिलेकडून तीन किलो अंमली पदार्थ जप्त

0

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका महिलेला अटक करुन तिच्याकडून सुमारे तीन किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे. तसेच 10 हजार रँड (दक्षिण आफ्रिकेचं चलन) देखील जप्त करण्यात आलं आहे.

ही महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. त्यावेळी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने तिच्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी तिच्या बॅगमध्ये सुमारे 2.960  किलो एवढं हेरॉइन सापडलं आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तयार करण्यात आलेली हेरॉइनची वाहतूक कतार एअरलाइन्सने जोहान्सबर्गहून दोहामार्गे मुंबईत आणण्यात आलं होतं. मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबण्याची तिची योजना होती. त्यानंतर भारतातील आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटशी संबंधित लोकांशी संपर्क साधणार होती.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, पकडण्यात आलेल्या 3 किलो अंमली पदार्थ अफगाणिस्तान येथील असून तो अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तयार करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातून ते इराण किंवा मध्य पूर्वच्या इतर देशांमध्ये पाठविलं जातं आणि तेथून दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात येतं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेतून इतर देशांना त्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी त्याची वाहतूक केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.