नरहरी झिरवाळ अ‍ॅक्शन मोडमध्ये ! शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस

0

मुंबई : बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर अपात्र ठरवावं अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत मांडण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या आमदारांनी त्यांचे मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. आजपासून सर्वांना नोटिस बजावण्यात आली आहे. या आमदारांना सोमवारी 27 जून पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास अपात्र ठरवण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता हे बंड मोडून काढण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यासाठीचा अर्ज विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आला होता. त्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना आता सोमवारी 27 जून पर्यंत 5.30 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. या कालावधीत नोटिसीला उत्तर दिले नाही तर या नोटिसीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या आमदारांना नोटीस
एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे.

Leave A Reply

Your email address will not be published.