नातेवाईक तरुणाच्या अश्लील मेसेजमुळे तरुणीची आत्महत्या

0

पिंपरी : औरंगाबाद येथून नातेवाईक म्हणून आलेल्या तरुणीने विनयभंग करुन अश्लील मेसेज पाठवल्याने तरुणीने घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी गौरव सोपान नारखेडे (३०, रा. सिडको, औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या जवळच्या नात्यातील गौरव नारखेडे हा एप्रिल २०१८ मध्ये औरंगाबादहून त्यांच्या घरी सुट्टीसाठी रहायला आला होता. घरात कोणी नसताना फिर्यादी यांच्या मुलीचा विनयभंग केला. तसेच मुलीला अश्लिल मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रासलेल्या त्यांच्या मुलीने ६ डिसेंबर २०२० रोजी राहत्या घरातील गॅलरीमधून उडी मारुन आत्महत्या केली. तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.