मुंबई : मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र त्यानंतर नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा फटका भिजलेला निघाला होता. परंतु मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करुन राईचा पर्वत केला.
देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. परंतु त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केले आहे. आज फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांचा फटाका भिजलेला निघाला. आता उद्या सकाळी मी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. अंडरवर्ल्डच्या माध्यमातून शहराला कुणी ओलीस धरले होते. कुठला आंतरराष्ट्रीय डॉन भारतात आला होता. तो कोणासाठी काम करत होता, हे उद्या उघड करणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.
कुर्ला येथे गोवावाला कंपाऊंड एलबीएस रोडवरील जमीन सलीम पटेल आणि शहा वली खान यांच्याकडून मलिकांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. फराज मलिक यांनी ही जमीन खरेदी केली होती. या दोघांनी सॉलिडस इन्वेस्टमेंट कंपनीला विकली होती. 1 कोटी महिना या दराने ही जागा भाड्याने दिली आहे. 2005 ही अवघ्या 30 लाखात जमीन खरेदी केली. बाजारभावापेक्षा कमी दरात ही जमीन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून घेतली. कवडीमोल दरात ही जमीन खरेदी करण्यामागे काय हेतू होता.? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.