मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिले नाहीत. राणे घाबरले म्हणून त्यांनी पक्ष प्रवेश केला… आता त्यांना काही बक्षिसी मिळाली म्हणून ते काहीही बोलत आहेत… असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला आहे.
लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरुमध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही.
असा टोला नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत मलिकांना लगावला होता. मलिक यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून एवढे पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता. यावेळी मलिक यांनी वानखेडे 50 हजारांचे शर्ट पँट वापरतात असे म्हटले होते. या सर्व प्रकरणावर राणेंना विचारले असता त्यांनी मलिकांवर टोलेबाजी केली.
राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. ज्यांनी पक्षप्रवेश करुन मंत्रिपद नाही सांगायची गरज नाही. हे सरकार 25 वर्षे चालेल कोणी त्याची काळजी करु नये. कोणाच्या कुटुंबापर्यंत मी गेलो नाही. पण ड्रग्सचा पैसा आला तर त्यातून अल्बम बनवला जातो त्यावर गप्प बसायचे का? अशा शब्दात मलिक यांनी प्रत्युत्तर दिले.