एनसीबीचा फर्जीवाडा सुरुच, भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात…

0

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी नवाब मलिक एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे आणि एनसीबीच्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय भाजप नेते दिल्लीत समीर वानखेडेंसाठी लॉबिंग करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही सुरुच आहे. 2021 मध्ये एनसीबीने खोटे आरोप दाखल केले जात होते. मोठ्या प्रमाणात पैसे वसूल कले जात होते. क्रूझवरील रेड नंतर अनेक प्रकरणं पुढे आली. एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. मागील तारखांच्या पंचनाम्यावर सही केली जात आहे, असा आरोप मलिकांनी केला आहे.

Addressing the Press Conference. https://t.co/WNeQDVEuKu

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 2, 2022

2 ऑक्टोबर 2021 च्या क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा सुरु आहे. मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बँक डेटवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मलिक यांनी केला. यावेळी संभाषणाची क्लिप ऐकवत मलिकांनी वानखेडेवर निशाणा साधला. तसेच एसआयटी समीर वानखेंडेवर आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

समीर वानखेडें बातम्या प्लांट करत आहेत की, मला एक्सटेन्शन नकोय. मी तीन महिने सुटीवर जाणार आहे. पण माझ्या माहितीनुसार दिल्लीत लॉबिंग सुरु आहे. 31 तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केलं गेलं नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केलं गेलं? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिलं जावं, असा आरोप मलिकांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.