पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपत आहे. त्यामुळे महापाैरांनी शहरातील प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष तथा नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक नाना काटे ,राजू बनसोडे, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, प्रवीण भालेराव, मयूर कलाटे यांनी केली.
याबाबत महापाैर माई ढोरे यांना राष्ट्रवादीकडून निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रलंबित विकासासाठी ही महासभा खूप महत्त्वाची आहे. याकरिता महापौरांनी निश्चित भूमिका सकारात्मक घ्यावी, विकासासाठी कुठलीही तडजोड नाही. या अनुषंगाने, पाच वर्षात झालेल्या विकास कामाची आणि सध्या भ्रष्टाचाराची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यामुळे लोकांचा लोकप्रतिनिधी वरचा विश्वास कमी होऊ शकतो या अनुषंगाने आम्ही स्थायी समिती सदस्य या नात्याने ही मागणी करत आहोत. त्यामुळे ही मागणी लवकर मान्य करून शहरवासीयांना दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या. अशी मागणी केली आहे.