राष्ट्रवादी काँग्रेसला आता पदवीधरांचे बळ…

0
पिंपरी : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्यात अरुण लाड निवडूनही आले. राष्ट्रवादी पदवीधर संघ या नवीन सेलची बीजे यावेळी शहरात रोवली गेली. काल झालेल्या पद वाटप बैठकीत राष्ट्रवादी पदवीधर संघाने शहरातील तब्बल ५० जणांना पदे दिली. यामध्ये डॉक्टर,आर्किटेक्ट ,एमबीए,कॉम्पुटर इंजिनीरिंगची पदवी असलेल्या पदवीधरांना पदे देण्यात आले.

कार्याध्यक्ष म्हणून युनूस शेख यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी ऋषिकेश आचार्य,आदित्य धुमाळ,कोमल शिंपी , दिनेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी वंदना पेडणेकर , तर अभिजित घोलप यांची भोसरी आणि सुप्रित जाधव यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सरचिटणीसपदी निकिता सुरवसे यांची निवड करण्यात आली.

यावेळी नगरसेविका डॉ.वैशाली घोडेकर यांनी ‘युथ अँड पॉलिटिक्स’ तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकचे विशाल काळभोर यांनी ‘संघटन आणि युवक’ या विषयावर मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड पदवीधर सेल अध्यक्ष माधव पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले कि,सगळे म्हणतात सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे पण ५० पदवीधरांना प्रत्यक्ष पद देउन राजकारणात आणण्याचा एक छोटा प्रयत्न या जम्बो कार्यकारणीद्वारे मी करत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संजोग वाघेरे (पाटील) म्हणाले कि, या पदवीधरांची मदत येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला नक्की होईल.पदवीधरांची ही टीम राष्ट्रवादी पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोविण्यासाठी एक दुवा ठरेल.

यावेळी मुख्य सरचिटणीस प्रवक्ते फझल भाई शेख,मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, शक्रुला भाई पठाण तसेच अकबर मुल्ला, साहुल हमीद भाई,महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके ,महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सरचिटणीस निलेश पुजारी,सामाजिक न्याय च्या अध्यक्षा गंगाताई धेंडे , युवती अध्यक्षा वर्षा जगताप,राष्ट्रसेवा दलचे अध्यक्ष महेश झपके आणि इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.