राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून पैश्यांची मागणी; गुन्हा दाखल

0

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाजात बोलून व्यवहारात पैश्यांची मागणी केल्याचं समोर आलंय. यामुळं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

याप्रकरणी प्रतापराव वामन खंडेभराड (54, रा. कडाचीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर धीरज धनाजी पठारे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या आवाजाचा वापर करून प्रतापराव वामन खंडेभारड यांच्या धीरज धनाजी पठारे आणि त्याच्या साथीदारांनी पैश्यांची मागणी केली. खांडेभारड यांनी 2014 ला धीरज पठारे यांच्या कडून 1 कोटी 20 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या साठी खांडेभराड यांनी पठारे यांना 13 एकर जमीन ही दिली होतो. मात्र चक्रवाढ व्याज पद्धतीने तो पैश्यांची मागणी करत होता.
जमिनीचा व्यवहार होत नाही असे कारण सांगून पठारेने याने पुन्हा जानेवारी पासून पैशांची मागणी केली. पैशे देत नाही म्हणून पठारे याने साथीदारांच्या मदतीने संगणक आणि इंटरनेट चा वापर करत थेट शरद पवार यांच्या घरचा नंबर वापरून खांडेभराड यांच्या कडे पैशांची मागणी केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.  त्यांना 20 तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुबंई नंतर खांडेभराड हे चाकण मध्ये राहत असल्याने आरोपी विरोधात चाकण मध्ये ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.