पिंपरी : कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये आलेली संकटे समोर असताना देखील आणि राज्य सरकार मोठे अडचणीत असताना देखील उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला तारणारा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प समतोल असल्याचं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे.
यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे अजित पवार यांचा अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे, फाजल भाई शेख, गोरक्ष लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वाघेरेनीं भाजपावार निशाणा साधला. वाघेरे म्हणाले कि, आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला त्यांची जागा दाखवून देऊ. सत्ताधारी भाजप पक्षाने या ४ वर्षात पिंपरी चिंचवड शहरात काहीही विकास केला नाही. या ४ वर्षात एकही चांगला प्रोजेक्ट शहरात आला नाही. भाजप नेत्यांनी फक्त आपले खिसे भरून घेतलेत. अशी घणाघाती टीका वाघेरेंनी केली.