मुंबई : राज्यासह, अनेक जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध घातले असून देखील प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्य सरकार कडक लॉकडाऊन (कडक निर्बंध) करण्याचा विचार करत आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकार अचानकपणे लॉकडाऊन लादत नाही. मात्र, चेन तुटण्यासाठी लॉकडाऊन अटळ आहे. कालच काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी बैठकीदरम्यान लॉकडाऊन लावायचा असेल तर एक-दोन दिवस वेळ द्यावा असे सांगितले आहे असेही अस्लम शेख म्हणाले.
मुख्यमंत्र्याची टास्क फोर्ससोबत बैठक सुरू आहे. उध्दव ठाकरे हे टास्क फोर्समधील ज्येष्ठ डॉक्टरांशी चर्चा करीत आहेत. लॉकडाऊन हा 7 दिवसाची की 14 दिवसांचा असावा याबाबत देखील चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.