सौम्य आणि लक्षणविरहित कोरोना रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ साठी नव्या ‘गाईडलाइन्स’

0

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य आणि लक्षणविरहित कोविड-19 रुग्णांसाठी गृह-अलगीकरणासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लक्षणविरहित रुग्ण म्हणजे, कोविड संसर्ग झाला असलेले मात्र कोणतीही लक्षणे जाणवत नसलेले तसेच, ऑक्सिजनची पातळी खोलीमध्ये 94 टक्के पेक्षा जास्त असलेले रुग्ण. तसेच सौम्य लक्षणे असलेले रुग्ण म्हणजे ज्यांच्या श्वसननलिकेच्या वरच्या भागात संसर्गाची सौम्य लक्षणे( किंवा ताप) आहे. मात्र, श्वास घेण्यास अडचण नाही तसेच ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, असे रुग्ण गृह-अलगीकरणासाठी पात्र असतील.

गृह-अलगीकरणासाठी कोण पात्र असतील.

– रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य/लक्षणविरहीत रुग्ण असल्याचे प्रमाणित करायला हवे.

– अशा रुग्णांच्या घरी त्यांना स्वयं-अलगीकरणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध असाव्यात, तसेच इतर कुटुंबियांना अलगीकरणात राहण्याची देखील सुविधा हवी.

– अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी व्यक्ती चोवीस तास उपलब्ध असावेत. तसेच, काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्णालये/डॉक्टर यांच्यात रुग्णांच्या संपूर्ण गृह-अलगीकरणाच्या काळात संपर्क असण्याची पूर्वअट असेल.

– 60 वर्षे वयावरील व्यक्ती किंवा ज्यांना इतर काही सहव्याधी आहेत, जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसे/यकृत/मूत्रपिंडाचे जुनाट आजार, मज्जासंस्थेशी निगडित आजार, असलेल्या रुग्णांची डॉक्टरकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याना गृह-अलगीकरणाची परवानगी दिली जाऊ शकते.

– ज्या रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती कमी /करणारे, त्यावर आघात करणारे आजार आहेत ( HIV, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग इत्यादी) अशा रुग्णांना गृह-अलगीकरणात ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. त्यांच्या डॉक्टरकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याना गृह-अलगीकरणाची परवानगी दिली जाऊ शकते.

– अशा रुग्णांची काळजी घेणाऱ्या आणि त्यांच्याशी संपर्क येणाऱ्या सर्व व्यक्तींनी प्रोटोकॉल नुसार आणि डॉक्टरच्या शिफारसीनुसार, हायड्रोक्सिंक्लोरोक्वीन प्रोफायलैक्सीस औषध घ्यायला हवे.

रुग्णांसाठीच्या सूचना :

– रुग्णाने स्वतःला घरातील इतर व्यक्तींपासून विलग करावे. एकाच निश्चित खोलीत आणि इतर लोकांशी संपर्क येणार नाही, अशा जागी राहावे. विशेषतः घरातील वयोवृद्ध लोक आणि इतर आजार असलेल्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवावे.

– रुग्ण असलेल्या खोलीत हवा खेळती रहायला हवी, तसेच खिडक्या सतत उघड्या ठेवायला हव्यात, जेणेकरून, खोलीत ताजी हवा येऊ शकेल.

– रुग्णाने पूर्णवेळ ट्रिपल लेअर वैद्यकीय मास्क लावावा. प्रत्येक 8 तासांनंतर किंवा तो ओला झाला असल्यास मास्क बदलावा. जर काळजी घेणारी व्यक्ती खोलीत प्रवेश करणार असेल, तर त्या व्यक्तीने आणि रुग्णानेही N 95 मास्क लावावा.

– एक टक्का सोडियम हायपोक्लोराईट असलेल्या द्रवाने निर्जंतुक केल्यानंतरच मास्क फेकला जावा.

– रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी द्रवरूप पदार्थ प्यावेत.

– पूर्ण वेळ श्वसनाचे सगळे नियम पाळले जावेत.

– साबण आणि पाण्याने किमान 40 सेकंद वारंवार हात धुवावे. किंवा अल्कोहोल युक्त सॅनिटायझरने स्वच्छ करावेत.

– आपल्या वैयक्तिक वापराच्या वस्तू घरातील कोणालाही वापरु देऊ नयेत.

– खोलीतील ज्या भागाला/वस्तूंना रुग्णाचा वारंवार स्पर्श होतो, अशा वस्तू (टेबल, दार, हैंडल्स वगैरे) 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईट द्रवाने स्वच्छ कराव्यात.

– रक्तातील ऑक्सिजनची पातळी ऑक्सिमीटरच्या मदतीने रुग्णाकडूनच वारंवार तपासली जावी, अशी आग्रही शिफारस करण्यात येत आहे.

– रुग्णाने स्वतःच रोज आपला ताप तपासावा आणि त्यात खाली दिलेल्या तक्त्यानुसार काही बदल लक्षात आल्यास ताबडतोब त्याची माहिती काळजी घेणाऱ्या व्यक्तीला द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.