नवी दिल्ली ः ”सध्याच्या संसदभवनाने आपल्या स्वातंत्र्यानंतर दिशा दाखविण्याचं काम केलं आहे. तर, नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचा साक्षीदार ठरेल”, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये नवीन संसद भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी संसद भवनाचे महत्व भाषणामध्ये सांगितले. मोदी पुढे म्हणाले की, ”नवीन संसदेमध्ये अनेक नव्या गोष्टी असतील, त्यामुळे खासदारांची दक्षताही वाढेल, त्याचबरोबर त्यांच्या शैलीमध्ये आधुनिकता येईल”, असंही मोदींनी म्हटलं आहे.
”आपल्या सर्वांना लोकप्रतिनिधी म्हणून लक्षात ठेवायला हवं की, लोकशाही हा मूळ संसदेचा आधार आहे. त्या आधाराबद्दल आपण कायम आशावाद ठेवायला हवा. ते आपले कर्तव्य आहे. संसदेतला प्रत्येक प्रतिनिधी जनतेला उत्तर देण्यास बांधील असतो, हे त्यांनी विसरता कामा नये”, असे मत त्यांनी या कार्यक्रमात मांडले.