स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास स्कीमची आणली आहे. ज्येष्ठ नागरिक बँकेकडून 14 लाखांचे कर्ज घेऊ शकतात. एसबीआय ने पेंशन लोन ही योजना खास निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी तयार केली आहे.
एसबीआय ने आपल्या एका ट्वीटमध्ये सांगितले आहे की 9.75 टक्के दराने पेंशन लोन मिळवा आणि एक आनंददायी निवृत्ती अनुभवा. यासंबंधातील अधिक माहितीसाठी 7208933145 वर एसएमएस करा.
एसबीआय पेन्शन कर्ज योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे पेन्शनधारक अर्ज करू शकतात. यासाठी पेन्शनरचे वय 76 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच पेन्शन पेमेंट ऑर्डर एसबीआयकडे असले पाहिजे. कौंटुबिक निवृत्तीवेतन धारकांचे जास्तीत जास्त वय 76 वर्षे आहे. कौटुंबिक पेन्शनमध्ये पेन्शनधारकांच्या निधनानंतर कुटुंबातील अधिकृत सदस्य निवृत्तीवेतनासाठी अर्ज करू शकतात.
जर एखादा इच्छुक वरिष्ठ नागरिक पेन्शन लोन घेऊ इच्छित असेल, तर त्यांना एक नंबर डायल करून, मिस्ड कॉल किंवा मेसेज करून अर्ज करता येईल. 180089-2211 डायल करा अथवा 7208933145 वर मिस्ड कॉल किंवा एसएमएस “PERSONAL” करून ही प्रक्रिया करता येईल. यानंतर बँकेकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.