पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना नववर्षाचे गिफ्ट

शहरातील 487 जणांना बढती

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 487 पोलीस कर्मचाऱ्यांना नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला गिफ्ट मिळाले आहे. या पोलिसांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. वर्षभरात दोन वेळा पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने येणारे वर्ष चांगले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड मधील सर्व पोलीस ठाण्यातील आणि विविध ठिकाणी काम करणाऱ्या 272 पोलिस शिपाई यांना पोलिस नाईक, 150 पोलिस नाईक यांना हवालदार तर 65 पोलिस हवालदार यांना सहायक फौजदार पदी पदोन्नती देण्यात आलेली आहे. याबाबतचा आदेश आज 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री उशीरा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढलेला आहे.

पोलिसांच्या दृष्टीने 2020 वर्ष हे फारच अवघड आणि त्रासदायक गेले आहे. मार्च महिन्यापासून देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे अहोरात्र जीव मुठीत ठेऊन काम करावे लागले. यामध्ये 500 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात दिली. तर अजून काही कर्मचारी कोरोनाचा सामना करत आहेत. दुर्देवाची गोस्ट म्हणजे कोरोनामुळे तीन कर्मचाऱ्यांचा बळी गेला. या सर्व घटनांमधून जात असताना 487 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने नवं वर्षात काम करताना हुरूप वाढणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.