नवनियुक्त भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप ‘ऑन फिल्ड’
ताथवडे-रावेत भागातील रस्त्यांच्या कामाला ‘गती’ देण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी
पिंपरी : पिंपरी–चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गावे ताथवडे, रावेत आणि पुनावळे परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांमुळे ऐनपावसाळ्यात या भागातील नागरिक, वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने खराब झालेले रस्तेतातडीने दुरुस्त करावे , अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची बुधवारी महापालिका भवनात भेट घेतली. यावेळी माजी सत्तारुढ पक्षनेतेनामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेवक राजू दुर्गे, उद्योजक नवीन लायगुडे, बाळासाहेब करंजुलेउपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले की, ताथवडे, रावेत, पुनावळे या परिसरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. तातडीने खराब झालेले रस्तेदुरुस्त करून घ्यावेत तेसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे काहीठिकाणी पाणी साचले आहे. किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करणे अपेक्षीतआहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी खराब झालेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ताथवडे, पुनावळे आणि रावेतमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटला…
महापालिका हद्दीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून प्रतिवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, प्रशासनाने गतवर्षी नियमांमध्ये बदलकेले. दहावी, बारावीच्या सीबीएसई माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, सर्वसामान्यकुटुंबांतील विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केल्याची भावना निर्माण झाली होती. यावर महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनासमान न्याय द्यावा आणि शिष्यवृत्ती योजना सर्वांना लागू करावी, अशी मागणी शंकर जगताप यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाददेत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शिष्यवृत्तीचे समान वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ‘सीबीएसई’ माध्यमाच्याविद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.