मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अॅटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात येत आहे. त्यांच्याकडे यापूर्वी चौकशीही करण्यात आली होती. प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयए (NIA) ने
आज सकाळी ६ वाजल्यापासून छापा घातला टाकला आहे.
एनआयएने (NIA) आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकता स्थानिक पोलिसांची मदत न घेता थेट सीआरपीएफ (CRPF) ची मदत घेतली आहे.
अंधेरी येथील प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या ८ ते १० कंपन्यांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. अंधेरीतील जे व्ही नगर भागात प्रदीप शर्मा यांचे एका पॉश सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर घर आहे. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय आहे.
प्रदीप शर्मा यांनी आतापर्यंत १००हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. त्यामुळे ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, सचिन वाझे याला अॅटिलिया प्रकरणात मदत केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर आता मुंबई पोलिसांचे पथकही येथे बंदोबस्तासाठी पोहचले आहेत.