नायझेरियन टोळीने महिलेला घातला चार कोटीला गंडा

सोशल मिडीयावरील मैत्री पडली महागात

0
पुणे : सोशल मिडीयावर झालेल्या मैत्रीनंतर महागडे गिफ्ट पाठवले आहे. मात्र ते विमानतळावर पकडण्यात आले असून त्यांना सोडविण्यासाठी एका महिलेकडून 3 कोटी 98 लाख 75 हजार 500 रुपये उकळण्यात आले आहे. हे पैसे मिळण्यासाठी नायजेरीयन टोळीने 67 बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
याबाबत कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेने सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोळीतील जँगो निकोलस (29), माँण्डे ओकेके (26, दोघेही रा. नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी एक जणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना ट्रान्झिट रिमांडद्वारे पुण्यात हजर करण्यात आले आहे.
21 सप्टेंबर 2020 ते 21 एप्रिल 2021 दरम्यान हा प्रकार घडला. आरोपींच्या घर झडती दरम्यान 21 मोबाईल, एक हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 सीम आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील रक्कम जप्त करायची असून जप्त करण्यात आले आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यांची पडताळणी करायची असून तांत्रिक विश्लेषण करायचे असल्याने आरोपींना 10 दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील मैथिली काळवीट यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक संगीता माळी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.