मुंबई : मुंबईत हॉटेल-रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर आता नाईटलाईफही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
राज्यातील विविध मुद्दय़ांवर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोविडचं संकट काही अंशी कमी होताना दिसत असल्याची चाहूल लागताच सरकारने लावलेल्या अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता दिली. याच पार्श्वभूमीवर काही व्यवहार हे पूर्ववत आणण्यासाठी आणि राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
कोविडनंतर लवकरच आम्ही पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरू करणार आहोत. मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत ज्यामध्ये अद्यापही कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. याच धर्तीवर नाईटलाईफदेखील लवकरच सुरू करू.
आम्ही एमटीडीसी आणि इतर हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत पार्टनरशिप करणार आहोत आणि त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करणार आहोत. राज्यातील पर्यटन क्षेत्रातही महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.