मुंबई ः ”शेतीतलं शिवसेनेला काय कळतं? शेती हो शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही. नरेंद्र मोदींना विरोध दर्शवायचा म्हणून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे”, अशी टीका भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
निलेश राणे पुढे म्हणाले की, ”शिवसेना हा प्रचंड गोंधळलेला पक्ष आहे. पक्षा उतरता काळ सुरु झाला आहे. त्यांची पतही घसरू लागली आहे. दिल्लीत शिवसेनेला कुणी किंमत देत नाही. एका भूमिकेवर ठाम राहत नाहीत, रोज खोटं बोलतात. जनता एक दिवस दखल घेणं बंद करेल आणि एक दिवस शिवसेना पक्ष अदखलपात्र ठरेल”, अशी मार्मित टीका निलेश राणेंनी केली आहे.
”१० वर्षांपूर्वी कृषी कायद्यांमध्ये बदल केला जावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. ते आता का कायद्याला विरोध करत आहेत, अनाकलनीय आहे. मोदींनी कायदा आणला म्हणून कायद्याला विरोध केला जातो आहे. फक्त पंजाबमध्येच या कायद्याला विरोध जास्त आहे. अन्य राज्यांमध्ये प्रभावी परिस्थिती दिसत नाही”, अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली.