निलेश राणेंची संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका 

0

मुंबई : “संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हूँ’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या”, अशी खालच्या पातळीवर जाऊन माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणेंनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी नोटीस आले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, ‘माझ्याशी पंगा घेऊ नका, मी नंगा माणूस आहे.’ त्यावरून भापजा आणि शिवसेना यांच्यात घुमासान सुरू आहे. एकमेकांवरची टीका आता खालच्या पातळीवर जाऊ लागली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे.

तसेच निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलंय की, “शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे”, अशी चेष्टाही शिवसेनेची राणेंनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.