गुंड गजा मारणेसह नऊ जणांना अटक, दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढुन, सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून, दहशत पसरवल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे सह त्याच्या आठ साथीदारांना कोथरूड पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. याशिवाय त्याच्या दीडश ते दोनशे साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गजानन मारणे, प्रदीप दत्तात्रय कंधारे, बापु श्रीमंत बागल, आनंता ज्ञानोबा कदम, गणेश नामदेव हुंडारे, रुपेश कृष्णराव मारणे, सुनील नामदेव बनसोडे, श्रीकांत संभाजी पवार आणि सचिन आप्पा ताकवले या नऊ जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याविरोधात भादवि कलम 267, 268, 270, 143, 149 सह डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गजा मारणे याने कोथरूड परिसरातील हमराज चौकात बंदी असतानाही समर्थकांची गर्दी जमवून Covid-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचा भंग केला आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फायदा घेऊन समर्थकांना जमवून गणपतीची आरती करण्यासाठी जमाबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.