मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडीबीए रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दुर्घटना घडली त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
सविस्तर बातमी थोड्या वेळात…