नवी दिल्ली (न्यूजकॉर्प्स) : फोर्ब्स मासिकाची १७ वी वार्षिक शक्तिशाली महिलांची सूची प्रसिद्ध करण्यात अली आहे. या सूचित भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस, बायोकॉनचे संस्थापक किरण मजुमदार शॉ आणि एचसीएल एंटरप्राइजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नादर मल्होत्रा यांना जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
फोर्ब्सच्या सूचीत १० राष्ट्रप्रमुख, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाच मनोरंजन क्षेत्रातील स्त्रियांचा समावेश असून, त्यांचे वय, राष्ट्रीयत्व आणि नोकरीचे वर्णन वेगवेगळे आहे . मात्र, त्यांनी २०२० च्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या व्यासपीठांचा चांगला उपयोग केले असल्याचे मत फोर्ब्सने व्यक केले आहे.
या सूचित जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल पहिल्या, ख्रिस्टिअन लेगार्ड दुसऱ्या, कमला हॅरिस तिसऱ्या, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 41, नादर मल्होत्रा 55, किरण मजुमदार-शॉ 68 व्या आणि रेणुका जगतियानी 98 व्या क्रमांकावर आहेत.