मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना राजेश टोपेंनी राज्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचेही सांगितले. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा आहे. ऑगस्ट महिन्यात 4 कोटी लसी उपलब्ध होतील. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी आहे. अशी माहिती टोपेंनी दिली आहे. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यामध्ये प्रवेश देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी असल्याचे टोपे म्हणाले. गेल्या 3 आठवड्यामध्ये रुग्ण संख्या स्थिर आहे. मात्र 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल 3 मध्ये अनेक जिल्हे आहे. उर्वरित 26 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याची माहितीती टोपेंनी दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे निर्बंध शिथिल केले जाणार नसल्याचे टोपे म्हणाले.