“कुणी कितीही आदळआपट केली तरी, तुमच्यावर डाग लागू शकत नाही”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचे कौतुक करत दिल्या नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई ः “करोनाच्या काळात आपण टाळेबंदी जाहीर केलं, निर्बंध लादले, वर्क फ्राॅम होमचा पर्याय दिला. पोलिसांनी वर्क फ्राॅम होम केलं असतं तर? काय झालं असतं? पण, तसं झालं नाही. पोलीस फ्रंटलाईनवर काम करत होते, म्हणूनच करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली. या करोनाच्या लढाईत अनेक पोलीस शहीद झाले”, असे पोलिसांचे कौतुक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहीद पोलिसांबद्दल दुःख व्यक्त केले.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. कुणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्यावर डाग लावू शकणार नाही. तुम्ही दक्ष राहून काळजी घेता, जबाबदारी घेता, त्यामुळे आम्ही आमचे सण साजरे करतो, त्यासाठी तुमचे धन्यवाद”, असे आभार मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांचे मानले.
पोलिसांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “पोलीस सतत तणावात असतात. नव वर्षाची सुरूवात माझ्या बहाद्दर कुटुंबियांच्या समवेत उपस्थित राहून करावी या जाणीवेतून मी महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. सर्व पोलिसांनी मी हेच सांगतो की, तुम्हा सर्वांना हेच वर्ष नाही तर, येणार अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि तणावमुक्ततेची जावोत”, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.