नवी दिल्ली ः ”मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष करोना लसीकडे लागलेले आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतलेली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबायची आवश्यकता नाही”, असे महत्त्वाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की, ”करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करू नका. मास्क, सोशल डिस्टन्सिंट गरजेचे आहे. जगभरात विविध कंपन्या करोना लसीचे वितरण करत आहे. मात्र, त्याची किंमत तुलनेने जास्त आहे. संपूर्ण जगच वाजवी किमतीतील परिणामकारक लसीची वाट पाहत आहे.”
काही दिवसांपूर्वी ”भारतात सुरू असलेलं संशोधन काही आठवड्यात पूर्ण होईल. त्यानंतर संशोधकांनी हिरावा कंदील दाखविला की लसीची त्वरीत वितरण करण्यात येईल. लसीच्या किमतीसंदर्भात चर्चा चालू आहे”, असेही मोदींना सांगितले होते,