पुढील वर्षी शिवनेरीवर कोणाचीही अडवणूक होणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस

0

 

शिवनेरी : पुढील वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर येण्यापासून कोणाचीही अडवणूक करणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शिवरायांना वंदन केल्यानंतर किल्ले शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. मात्र, सोहळ्यात शिवप्रेमींना प्रवेश नाकारल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत सर्व शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.