मुंबई ः ”आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये”, असे मत शिवसंग्राम पक्षाचे मेते आणि आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले.
रविवारी वडाळा येथे आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मेटे बोलत होते. मेटे यावेळी म्हणाले की, ”सुप्रिम कोर्टाने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून पुढची रणनिती ठरवावी. मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सरकार पुढे काय करणार आहे, यासंबंधी ४ जानेवारीपर्यंत सरकारने चर्चा करावी आणि जो निर्णय घेतला त्याबाबत मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊन माहिती द्यावी”, असे मत मेटे यांनी मांडले.
”जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये. डिसेंबरपर्यंत काहीच हलचाल केली नाही तर जानेवारीत बैठक घेऊन आगामी काळात आंदोलने, रास्ता रोको आणि धरणे आंदोलनचा निर्णय घेतला जाईल”, असा इशारा राज्यसरकारला विनायक मेटे यांनी दिला आहे.